Bhosari: महापालिका पदाधिकारी, अधिका-यांकडून पालखीत ‘पाणी, पर्यावरण स्वच्छते’बाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात महापालिकेच्या पदाधिकारी, अधिका-यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती केली. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’, ‘पर्यावरण वाचवू या, चला कचरा साफ करु या’, ‘करा कच-याचे वर्गीकरण, स्वच्छ सुंदर होईल पर्यावरण’, ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ असे संदेशाचे फलक हातामध्ये घेऊन पदाधिकारी, अधिका-यांनी जनजागृती केली.

हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी-चिंचवड शहरात आज (बुधवारी) सकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते मॅगझीन चौक, आळंदी फाटा, भोसरी येथे स्वागत करण्यात आले. महापालिकेतर्फे दिंडीप्रमुखांना मृंदग भेट देण्यात आला.

  • ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागातर्फे स्वच्छता जनजागृती दिंडी काढली. पदाधिकारी, अधिका-यांनी पर्यावरण, पाणी, स्वच्छतेचे संदेश दिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्याबाबतचे संदेश देणारे फलक हातामध्ये घेतले होते.

‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’, ‘पर्यावरण वाचवू या, चला कचरा साफ करु या’, ‘करा कच-याचे वर्गीकरण, स्वच्छ सुंदर होईल पर्यावरण’, ‘माझा कचरा माझी जबाबदारी’, ‘स्वच्छता पाळा, आरोग्य संभाळा’, ‘सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका’, ‘कचरा घंटागाडीत टाका, स्वच्छता ठेवा’ असे संदेशाचे फलक हातामध्ये घेऊन पदाधिकारी, अधिका-यांनी जनजागृती केली.

  • अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, ‘क’ प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ‘इ’ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, नगरसदस्या नम्रता लोंढे, प्रियंका बारसे, निर्मला गायकवाड, विनया तापकीर, नगरसदस्य नितीन काळजे, सचिन भोसले, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, स्वीकृत सदस्य सागर हिंगे, दिनेश यादव, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, आशा राऊत, अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, कार्यकारी अभियंता प्रवीण घोडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले या स्वच्छता दिंडीत सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.