Bhosari : शिवाजीराव आढळराव पाटील यांची भोसरीमध्ये  रॅली (व्हिडिओ)

एमपीसी  न्यूज – शिरुर लोकसभेचे शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज भोसरी विधानसभा मतदार संघातील भैरवनाथ मंदिर गावठाण येथे रॅली काढण्यात आली. भोसरी गावठाणातील भैरनाथ मंदिरात नारळ फोडून युतीच्या प्रचाराची सुरुवात केली. 

यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार  महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी,  तसेच महायुतीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी दहा वाजता भैरवनाथ मंदिर गावठाण येथुन गव्हाणे वस्ती, शीतलबाग , दिघीरोड, मानससरोवर, शास्त्रीचौक, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर मार्गे ही रॅली काढण्यात आली.  या रॅलीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.