BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: इंद्रायणी थंडीने खवय्यांसह भूकेलेल्यांची भागवली भूक

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायणी थडीने खवय्यांची हौस भागवली. त्याचबरोबर भूकेलेल्यांची देखील भूक भागवली. स्टॉलमधील उरलेले अन्नपदार्थ जमा करून चार दिवसातील वाया जाणारे अन्न चार हजार पाचशे भूकेलेल्या नागरिकांना देत त्यांची भूक भागवली. रॉबिन हुड आर्मी या संस्थनेने हा स्तुत्य उपक्रम राबविला.

शिवांजली सखी महिला मंचाचा देखील सक्रिय सहभाग असलेला हा महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान नागरिकांच्या अलोट गर्दीत, त्यांनी तेथे असलेल्या विविध उपक्रमांचा मनसोक्त आनंद लुटल्यामुळे ‘न भूतो, न भविष्यती ‘अशाप्रकारे यशस्वी झाला.

  • संस्थेच्या प्राजक्ता रुद्रवार यांनी सांगितले, रॉबिन हूड आर्मी ही समाजसेवी संस्था गरिबांसाठी काम करते. रॉबिन हूड आर्मीचे सभासद विविध हॉटेल्समधील उरलेले अन्नपदार्थ जमा करतात. भूकेलेल्या लोकांना वाटतात. रॉबिन हूड आर्मीमध्ये असणारे रॉबिन हूड स्वयंसेवक इतर ठिकाणी नोकरी करतात. ही संस्था कोणताही मोबदला न घेता गरीब मुलांना आणि गरजूंना जेवण पोहोचवण्याच काम करते. रॉबिन हूड आर्मीचे स्वयंसेवक वेगवेगळ्या शहरात नोकरी करणारे सामान्य नागरिक आहेत. आपल्या परिसरातील हॉटेल्सना संपर्क साधून, त्यांच्याकडे उरलेलं अन्न एकत्र जमवलं जातं. यानंतर हे जेवण शहरातील विविध भागात गरीब लोकांमध्ये वाटल जात.

काही रेस्टॉरंटनी, मोठ्या सोसायट्यांनी या संस्थेमार्फत गरजुंना मदत करता यावी म्हणून खास जेवण बनवायलाही सुरूवात केली आहे. तसेच बांधकाम मजुर, विट कामगार यांच्या मुलांसाठी संस्थेमार्फत विनामुल्य पाठशाळा देखील चालवली जाते. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्येही 24 हुन अधिक ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे.

  • इंद्रायणीथडी या प्रदर्शनामध्ये राँबिनहुड आर्मीचा स्टाँल ठेवुन “उरलेले अन्न फेकुन न देता आम्हाला द्या, आम्ही गरंजुपर्यंत पोहोचवू” अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली. त्यामुळे फार कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचणे सहज शक्य झाले. तसेच या ठिकाणी 120 हूनअधिक फुड स्टाँल्स असल्यामुळे त्यांचे देखील उरलेले अन्न काय करायचे हा प्रश्न स्टाँल मालकाला पडला नाही. इंद्रायणी थडीच्या चारदिवसीय महोत्सवात चार हजार पाचशे भुकेलेल्यांना अन्न देत त्यांची भूक भागवली.
HB_POST_END_FTR-A2

.