Bhosari : गवळी माथा रस्ता नूतनीकरणासाठी अभिप्राय पाठवा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या वतीने (Bhosari) टेल्को रस्त्यावरील गवळी माथा ते सेंच्युरी एन्का चौकापर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर, सारथी अॅप, स्मार्ट सिटीच्या civil@ pcmcindia.gov.in यावर 10 दिवसात अभिप्राय सादर करण्याचे आवाहन शहर अभियंता मकरंद निकम यांनी केले आहे.

शहरीकरण न नागरिकरणामुळे विविध सार्वजनिक वाहतूक पर्याय निवडणे आवश्यक झाले आहे. त्यादृष्टीने सकारात्मक नियोजन करुन नजिकच्या काळामध्ये सार्वजनिक वाहतूक, मोटार विरहित वाहतूक व सर्वसमावेशक पायाभूत सुविधा उभारण्याचे पालिकेचे उदिष्ट आहे. टेल्को रस्ता हा शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक रस्ता आहे. त्यापैकी गवळी माथा ते सेंच्युरी एन्का चौकापर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने पूर्ण रुंदीने विकसित करण्याचे नियोजन आहे.

Pimpri : हिमोफिलियाचा प्रश्न विधिमंडळात मांडणार – आमदार उमा खापरे

त्यानुसार या रस्त्याचे सलग पादचारी मार्ग, सलग सायकल (Bhosari) मार्ग, आवश्यक त्या ठिकाणी सेवा रस्ता व Recreational Area तयार करणे या संकल्पनेआधारे रस्त्याचे विकसन करण्याचे क क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाचे नियोजन आहे. नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करुन पूर्ण रस्त्याचे डिझाईन अंतिम केले जाणार आहे.

त्याकरिता सद्यस्थितीतील सेवा रस्ता, पादचारी मार्ग, सायकल चालविण्यास सुरक्षित असा नियोजित रस्त्याचे महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.