Bhosari : दुकान भाड्याने देण्यावरून वृद्ध नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज – दुकान भाड्याने देण्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एका वृद्ध नागरिकाला मारहाण केली हा प्रकार सोमवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास चव्हाण चाळ, कासारवाडी येथे घडला.

रमणलाल रामचंद्र शिंगवी (वय 71, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) असे जखमी झालेल्या वृद्ध नागरिकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भगवान खंडू चव्हाण (वय 75, रा. कासारवाडी) रुपेश चव्हाण, भगवान चव्हाण यांची नात सुप्रिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना त्यांचे दुकान भाड्याने देण्याच्या कारणावरून तसेच एग्रीमेंटच्या कारणावरून शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी भगवान याने फिर्यादी यांच्या डोक्यात व कपाळावर कोणत्यातरी वजनदार वस्तूने मारून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.