Bhosari : पूर्ववैमनस्यातून दुकानदाराला लोखंडी तराजूने मारहाण

भोसरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – किराणा दुकानदाराला चौघांनी दुकानात जाऊन दुकानातील लोखंडी तराजूने मारहाण केल्याचा प्रकार भोसरी येथील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत घडला.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून ही मारहाण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

धोंडोप्पा गोळ हे जखमी झाले असून त्यांची पत्नी मल्लम्मा गोळ (४५, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयीडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जावेद (वय 25, संपुर्ण नाव पत्ता माहिती नाही) त्याचे आजोबा, त्याचे चुलते आणि जावेदच्या आत्याचा नवरा (सर्व राहाणार महात्मा फुलेनगर झोपडपट्टी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळ हे 21 जानेवारी रोजी त्यांच्या दुकानात असताना आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या दुकानात घुसुन त्यांना शिवीगाळ करत त्यांना हाताने आणि दुकानातील लोखंडी तराजूने मारहाण केली. यामध्ये गोळ यांच्या डोक्याला जखम झाली. उपचार झाल्यानंतर गोळ यांनी मंगळवारी (दि. 29) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.