Bhosari : टेम्पो चालकाला मारहाण करत लुबाडले; एकाला अटक

एमपीसी न्यूज – टेम्पोसमोर दुचाकी आडवी आणत टेम्पो चालकाला (Bhosari) मारहाण केली व लुबाडले. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.9) दोपोडी येथे जुना पुणे-मुंबई महामार्गावर झाला.

याप्रकरणी नागेश सुनिल सोनावणे (वय 28 रा.सोलापूर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निचीकेत विजय बेळगावकर (वय 23 रा.वारजे) याला अटक केली असून त्याचा अल्पवयीन साथीदार व एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : एनसीईआरमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत-पाकिस्तानसह सात देशातील संशोधकांचा सहभाग

पोलिसांनी (Bhosari) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोतून जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी दुचाकी टेम्पोला आडवी लावून टेम्पो थांबवला. फिर्यादीला हाताने मारहाण करत फिर्यादीचा 10 हजार रुपयांचा मोबाईल चोरला. यावरून भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.