Bhosari : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; बापलेकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून बापलेकाने मिळून महिलेला व तिच्या मुलीला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी नऊच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली.

बबलू आबा गायकवाड, आबा गोपीनाथ गायकवाड (दोघे रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकाची नावे आहेत. याप्रकरणी आशा गणपत गोरे (वय 40, रा. सद्गुरू नगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आबा हा फिर्यादी आशा यांचा मेहुणा आहे. मंगळवारी सकाळी आशा आणि आबा दोघेजण बोलत थांबले होते. त्यावेळी बबलू तिथे आला. ‘तू माझ्या वडिलांबरोबर का बोलतेस’ असे म्हणून त्याने आशा यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने मारून आशा यांना जखमी केले. आशा यांची मुलगी भांडण सोडविण्यासाठी आली असता बबलू आणि आबा या दोघांनी मिळून तिला देखील मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.