Crime News : दुचाकीस्वाराला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – टोळक्याने मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटले आहे. हा प्रकार तळवडे येथील त्रिवेणीनगर शनिवारी (दि.28) येथे रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडला.

याप्रकरणी अभिषेक प्रेमराव गायकवाड (वय 19 रा.चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून चिखली पोलिसांनी याप्रकरणी ओमकार शिंदे, अनिल अरूण नाटेकर (वय 21), चैतन्य चंद्रशेखर जावीर (वय 23), पवन लष्करे, सारंग हरिभाऊ शिळवणे (वय 19) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यातील ओमकार, अनिल, चैतन्य, सारंग यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रासह मित्राकडून उसने घेतलेले 1 हजार 750 रुपये देण्यासाठी दुचाकीवरून जात होते.यावेळी शिवरकर चौक त्रिवेणीनगर येथे आरोपींनी फिर्यादीला अडवून हाताने मारहाण केली व त्यांच्या खिशातून जबरदस्ती 1 हजार 750 रुपये काढून घेतले. तसेच त्यांच्या दुचाकीची लाकडी दांडक्याने तोडफोड करून 5 हजार रुपयांचे नुकसान केले.यावरून चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.