Crime News : पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याला लाच मागताना अटक

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या कर विभागीय निरीक्षकाला वीस हजाराची लाच मागताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.ही कारवाई सोमवारी (दि.29) धनकवडी येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय येथे करण्यात आली.

संजय बबन काळे (वय 45 पद – विभागीय निरीक्षक, कर विभाग) असे अटक आरोपीचे नाव असून तो धनवकवडी येथील महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात कर विभागात काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांच्या इमारतीचा मिळकत कर त्यांच्या नावावर करून देण्याकरीत व जुना मिळकतकर न लावण्यासाठी विभागीय निरीक्षक काळे याने पहिल्यांदा 25 हजार मागितले नंतर 20 हजार रुपयांवर तडजोड केली.यावरून लाचलुचपत विभागाने त्यांना अटक केली आहे. याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याच्या पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे करत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.