Pune : पुण्यातील भाजप नगरसेवकाचा अंदुरेशी सबंध ; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा आरोप 

एमपीसी न्यूज – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणी जेरबंद केलेल्या सचिन अंदुरे याचे पुण्यातील भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांच्याशी संबंध असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 
3 वर्षा पूर्वी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा हा इसम म्हणजे सचिन अंदुरे  धीरज घाटे बरोबर तिथे उपस्थित होता. असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केला आहे.

भाजप नगरसेवक धीरज घाटे यांनी पोलिस आणि माध्यमांकडे तेव्हाचे फुटेज उपलब्ध आहे. आंदुरे तेव्हा आणि कधीही माझ्यासोबत नव्हता हे तपासाअंती समोर येईलच. हेच त्रिवार सत्य आहे. आरोप बिनबुडाचा आहे.

खोटे आरोप केल्याप्रकरणी मी लवकरच अब्रुनुकसानीचा दावा दाखल करीत आहे. आपली बाजू ट्विट करून मांडली आहे.

सचिन अंदुरे याला दाभोळकर खून प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. त्याला आठ दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. मात्र त्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत.

जेएनयू’मध्ये कन्हैय्याकुमार आणि उमर खलीदच्या मुद्यांवरून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयांत आव्हाड यांनी मार्च 2015 मध्ये आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाला उत्तर भाजप, भाजयुमोचे कार्यकर्ते उतरले होते. तेथे घाटे देखील उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.