Chinchwad News: भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे फेसबुक अकाऊंट हॅकरकडून हॅक करण्यात आले आहे. त्यावरून पैशांची मागणी केली जात असून कोणीही पैसे देऊ नयेत, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.
याबाबतची माहिती आमदार जगताप यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ट्विटमध्ये आमदार जगताप यांनी म्हटले आहे की, माझ्या नावे Laxmanjagtap Mla या नावाने एका फेसबुक अकाऊंट हॅकरकडून हॅक करण्यात आलेले आहे.
माझ्या नावे Laxmanjagtap Mla या नावाने एका फेसबुक अकाऊंट हॅकरकडून हॅक करण्यात आलेले आहे. या अकाऊंटवरून वैयक्तिक मेसेज पाठवुन पैशाची मागणी किंवा इतर वस्तुंची मागणी करत आहे. फेसबुक अकाऊंटवरून अशा वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे अशा पोस्टला कोणीही प्रतिसाद देवु देऊ नये. pic.twitter.com/VTU7bGQH7i
— Laxman Jagtap (@iLaxmanJagtap) July 18, 2021
या अकाऊंटवरून वैयक्तिक मेसेज पाठवुन पैशाची मागणी किंवा इतर वस्तुंची मागणी करत आहे. फेसबुक अकाऊंटवरून अशा वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे अशा पोस्टला कोणीही प्रतिसाद देवु देऊ नये.