Vehicle Theft : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन दुचाकी, एक कार चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (दि. 18) वाहन चोरीच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये भोसरी आणि वाकड परिसरातून भरदिवसा दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर हिंजवडी मधून एक दुचाकी आणि तळेगाव-दाभाडे परिसरातून एक कार चोरीला गेली आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात वरूण निलेश सुडोकार (वय 20, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 28 / ए एच 3753) 24 मे रोजी सकाळी आठ वाजता लांडेवाडी येथील अॅम्फेनाॅल कंपनीसमोर पार्क केली. भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी साडे आठ वाजता उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

खेमिया हनुमंता मेघावत (वय 32, रा. संजयगांधी वसाहत, पाषाण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीचे दुचाकी (एम एच 12 / जे बी 5494) 17 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता वाघमारे चौक सिल्वर जिम वाकड येथे पार्किंग मध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सायंकाळी सहा वाजता उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

सद्दाम लियाकत अली अन्सारी हुसेन (वय 27, रा. राक्षे वस्ती रोड, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 12 / एन टी 3557) सहा जुलै रोजी रात्री अकरा वाजता पेट्रोल संपल्यामुळे राक्षेवस्ती येथील एका हॉटेलसमोर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. सात जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

रमेश घिसाराम चौधरी (वय 34, रा. तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किंमतीची इको व्हॅन (एम एच 12 / पी एच 0835) 17 जुलै रोजी रात्री नऊ वाजता त्यांच्या सोसायटीच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे इको व्हॅन चोरून नेले. हा प्रकार 18 जुलै रोजी दुपारी उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.