Pimpri : संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनचा सत्कार

एमपीसी न्यूज  – भारतात प्रत्येक दिवशी 38000 रक्तदात्यांची गरज असते या सामाजिक कार्याची जाणीव ठेवून अनेक संस्था निःस्वार्थ भावनेने आपले योगदान देत असतात. प्राण वाचवण्यात मोलाचे ठरणाऱ्या रक्ताची किंमत अमूल्य असते. असे हे श्रेष्ठदान सर्वाधिक संख्येने करून अनेकांचे प्राण वाचविले म्हणून  प्रादेशिक रक्तपेढी  पुण्यातील ससून रुग्णालया येथे संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन व इतर संस्थांचा सत्कार  करण्यात आला.

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 20 रक्तदान शिबीरातून 4552 युनिट रक्त जमा करण्यात आले होतेे, तर यावर्षी एप्रिल 2018 पासून आतापर्यंत 4221 युनिट रक्त संकलित करण्यात आले असून मार्च 2019 पर्यंत अजून 10 रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत अशी माहिती फाऊंडेशन द्वारा देण्यात आली. निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या शिकवणुकीला आत्मसात करून रक्तदानाच्या माध्यमातून मानवता प्रस्थापित करण्यासाठी ही शृंखला 1986 पासून अविरत चालू आहे.

या कार्यक्रमाला  ससूनचे प्रभारी अधिष्ठाता मुरलीधर तांबे , वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजय तावरे ,  संत निरंकारी मंडळ पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी  , रोटरी क्लबच्या मिरा दमानी,  डॉ. कोरके, डॉ. लीना नखाते, डॉ. नलिनी काडगी   आदी  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.