Akurdi News : आकुर्डीत रविवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज –  राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक कै. जावेद शेख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने उद्या (रविवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

आकुर्डीतील दिवंगत जावेद शेख यांच्या जनसंपर्क कार्यालय समोरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा जवळ रविवारी सकाळी 10 ते 5 या वेळेत हे शिबिर होणार आहे.  भव्य रक्तदान शिबिरातील प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तु दिली जाईल. मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर, आवश्यक असणाऱ्या सर्व रक्त चाचणी, महिलांची मोफत थाइरॉइड चाचणी केली जाणार आहे.  आकुर्डी परिसरात वृक्षारोपण, कार्यक्रम स्थळी वृक्ष वाटप केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचे आयोजक निखिल दळवी यांच्याशी 9373323999 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.