Dapodi News : शिवसेना अखंडित राहवी यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकाची सोलापूर ते बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळापर्यंत पदयात्रा

एमपीसी न्यूज – शिवसेना पूर्वीप्रमाणेच अखंडित रहावी या उद्देशाने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम शिंदे यांनी सोलापूर ते मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळापर्यंत पदयात्रा सुरु केली आहे. या पदयात्रेचे फुगेवाडी येथे पिंपरी युवासेना प्रमुख निलेश हाके यांनी स्वागत केले.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर दोन गटात विखुरलेले शिवसैनिक एकत्रित यावे हा उद्देश ठेवून शिंदे पदयात्रा काढत आहेत. 42 वर्षीय उत्तम शिंदे हे दैनंदिन 35 ते 40 किलोमीटर पदयात्रा करत सर्व शिवसैनिकांमध्ये शिवसेनेचे एकजूट अबाधित राहो या दृष्टिकोनातून मार्गदर्शन व प्रचार करीत पायी वारी करत आहेत.

 

पिंपरी विधानसभा युवा अधिकारी निलेश हाके यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. सबंध महाराष्ट्रातील शिवसैनिक आज दोन गटात विखुरले आहेत. शिवसेना अखंडित राहो ही प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे. दोन्ही गट एकत्र येऊन पुन्हा एकदा शिवसैनिकांची ताकद विरोधकांना दाखवून देऊ, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.