Bollywood: बघा घटस्फोटानंतर हृतिकसोबत परत एकत्र राहण्याबाबत  सुझान खान काय म्हणते..

Bollywood: See what Suzanne Khan has to say about reuniting with Hrithik after divorce ..

एमपीसी न्यूज – अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खान यांनी लग्नानंतर बरीच वर्षे एकत्र घालवल्यावर काही वैयक्तिक कारणांमुळे घटस्फोट घेतला. पण त्यांचे दोन्ही मुलगे हृतिककडेच होते.  करोनामुळे सध्या देशात उद्भवलेली परिस्थिती पाहता सुझान मुलांची काळजी घेण्यासाठी पुन्हा हृतिकच्या घरी राहण्यास आली. त्यानंतर हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सुझानचे आभार मानले होते.

पण सुझानला हृतिकच्या घरी आल्यावर कसे वाटत आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. सोशल मीडियावर या मुलाखतीचा फोटो पोस्ट करत सुझानने ‘तुमच्या घरातील चार भिंतीमध्ये केलेले काम हे तुमच्या सर्वोत्तम कामापैकी एक असते’ असे कॅप्शन दिले आहे.

सुझानने नुकताच एका मासिकाला मुलाखत दिली. यात खुद्द सुझानने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मुलाखतीमध्ये तिने घेतलेल्या निर्णयाच्या सकारात्मक बाजू मांडल्या आहेत. त्यांच्या घटस्फोटापासून हे दोघेही नेहमी बातम्यांमध्ये राहिले आहेत. कारण त्यानंतरही आम्ही चांगले मित्र आहोत असे ते दोघेही म्हणत असत. आता सुझान काही दिवसांसाठी परत आल्यामुळे हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सुझानचे आभार मानले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.