Bjp : बुथप्रमुख केवळ कार्यकर्ता नाही तर पक्षाचा कणा- नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज : “मेरा बुथ सबसे मजबूत” याविषयी देशातील भाजपा (Bjp) पक्षाच्या बुथप्रमुखाशी थेट संवाद साधताना कासारवाडी येथे भाजपा नेते प्रकाश जवळकर यांनी त्यांच्या घरी पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आयोजित केलेल्या मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आलेल्या कार्यक्रमात (स्क्रीनवर)प्रत्यक्ष मोदींनी बोलताना व्यक्त केले.

Pune : पावसाळ्यामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज – महावितरण

भाजपा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठा असा एकमेव पक्ष आहे.   गेल्या ९वर्षामध्ये अनेक लोकोपयोगी विधायक कामे केली असून आज त्याचा फायदा सर्वच जनतेला होत आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार चालविणारा सुरुवातीलाच आपण संकल्प केला असून अद्यापही आपली तशीच वाटचाल चालू आहे.

 

आपण केलेल्या कामाबाबत जनता समाधानी असून २०२४ला जनता पुन्हा आपल्याच हातात सत्ता देईल यात तिळमात्रही शंका नाही असेही मोदीजी म्हणाले. प्रकाश जवळकर यांनी प्रास्ताविकात उपस्थितांना केंद्र, राज्य शासनाच्या योजनांची माहिती दिली व २०२४ ला भाजपा निवडून देण्याचे आवाहन केले.

 

याप्रसंगी बुथप्रमुख नानासाहेब डवरी, शशिकांत शेंडे, बाळासाहेब जवळकर, रघुनाथ जवळकर, गणेश जवळकर, संजय शेंडगे, आप्पासाहेब धावडे, अॅड.अमित जवळकर, राहुल जवळकर,  गुलाबराव जवळकर, दादासाहेब सुतार, छबुराव राखपसरे, गौतम मागाडे, नानासाहेब कांबळे, आशा जाधव,  मनिषा नलावडे, मंदा शिंदे, निलम जवळकर, छाया रांगले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. चिटणीस देवदत्त लांडे यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.