Bopkhel News: दिघी करसंकलन कार्यालयाचा उपविभाग सोमवारपासून बोपखेल येथे सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिघी करसंकलन कार्यालयाचा उपविभाग बोपखेल येथे येत्या 14 फेब्रुवारीपासून नव्याने सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी आज दिली.  कॅश काउंटरसह सुरु होणा-या या उपविभागात करआकारणी संबंधीत अर्ज आणि भरणा स्विकारला जाईल.

दिघी-बोपखेल करसंकलन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढते नागरीकरण, वाढती मिळकत संख्या आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करता दिघी करसंकलन कार्यालयातील काही गटांचे तसेच कामकाजाचे विभाजन करून प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नवा उपविभाग सुरु केला जात आहे.  याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

बोपखेल गावठाण येथील मारुती मंदिराजवळील महापालिकेच्या इमारतीमधील तळमजल्यावर कॅश काऊंटरसह उपविभाग सुरु होत आहे.   बोपखेल येथील उपविभाग दिघी-बोपखेल करसंकलन विभागीय कार्यालय हे इ क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली राहील.  या उपविभागाअंतर्गत आवक जावक टपाल कक्ष, वसुली आणि भरणा, कर आकारणी तसेच कॅश काउंटर विषयक सर्व कामकाज करण्यात येणार आहेत.  दिघी-बोपखेल विभागीय कार्यालयात गट क्रमांक 1 ते 3 हे  गट दिघी-बोपखेल करसंकलन कार्यालय कार्यरत राहील.  तसेच प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने या कार्यालयात गट क्रमांक ४ संबधित करआकारणी बाबत अर्ज तसेच भरणा स्विकारला जाईल.  या उपविभागामुळे बोपखेल आणि दिघी येथील नागरिकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.