Dehu News: राष्ट्रवादीच्या स्मिता चव्हाण बनल्या देहूच्या पहिल्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे 

देहू नगरपंचायत  सभागृहात 17 सदस्यांपैकी 11 महिला

एमपीसी न्यूज – देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण यांना तर प्रथम उपनगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्याच रसिका काळोखे यांना मिळाला. दोघींचीही बिनविरोध निवड झाली.   

हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय असवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 16 सदस्य उपस्थित होते.  या मात्र या वेळी उपस्थित नव्हत्या. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या पूजा काळोखे सभागृहात आल्या. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सभेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी चव्हाण व काळोखे यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
देहूचे नगराध्यक्षपद अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. अध्यक्षपदाच्या रिंगणातून पूजा दिवटे यांनी काल (गुरूवारी) माघार घेतली होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी केवळ स्मिता चव्हाण यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी रसिका काळोखे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
पीठासन अधिकारी संजय असवले व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर अध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर अध्यक्ष स्मिता चव्हाण व रसिका काळोखे यांनी मनोगते व्यक्त करीत सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

https://www.youtube.com/watch?v=cySnXGlJDSs

 सभागृह नेते योगेश परंडवाल यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत केले. गावाच्या विकासासाठी जे जे चांगले करता येईल ते राजकारण बाजूला ठेवून एकत्र येवून काम करू, असे त्यांनी सांगितले.
सभेनंतर पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा वैशाली टिळेकर, सत्तारुढ पक्षनेता कांतीलाल काळोखे, पक्ष समन्वयक बाळासाहेब काळोखे तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
फटाक्यांची आतषबाजी तसेच गुलाल आणि भंडाराची उधळण करीत जल्लोषात विजय मिरवणूक काढण्यात आली. आमदार सुनील शेळके हे देखील काही वेळासाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.