Pune Corona Update : कोरोना आकडेवारी घसरली! शहरात नवीन 700 रुग्णांची नोंद; 2197 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमालीची घसरली आहे. शहराच्या विविध भागातील नवीन 700 कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2197 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 326 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 6 लाख 55 हजार 996 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 7 हजार 489 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 700 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 6 हजार 448 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 44 लाख 23 हजार 970 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमालीचा उतरता पाहायला मिळत असला तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.