Sangvi Crime News : घरात घुसून महिलेचा विनयभंग; कारची तोडफोड

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात घुसून तिघांनी तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या घराबाहेर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 9) सायंकाळी सात वाजता पिंपळे गुरव येथे घडली.

सागर हरिश्‍चंद्र कांबळे, जितेंद्र कांबळे (दोघेही रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) आणि त्यांचा साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज पॉडकास्ट 11 मार्च 2022 – ऐकूयात पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरासह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी तिघेजण फिर्यादी यांच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी यांच्या पतीबाबत विचारणा करत गोंधळ घातला. त्यावेळी फिर्यादी यांनी “तुम्ही कोण आहात’, असे विचारले असता आरोपीने पीडित महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर घरात सुरु असलेल्या फर्निचरच्या कामातील प्लायवूड उचलून आदळ-आपट करत आरडाओरडा केला. घराबाहेर पार्क केलेल्या फिर्यादी यांच्या कारच्या काचा लाकडी फळीने फोडून नुकसान केले. याप्रकरणी सागर कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

काऊंटडाऊन दहावी! भाग 10 – Tricks to score higher in SSC English Exam – Santosh Khatal. Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.