Theft News: सीसी टीव्हीवर काळा स्प्रे मारून पिंपळे निलख येथे घरफोडी

एमपीसी न्यूज – सीसी टीव्ही वर काळा स्प्रे मारून चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून घरफोडी केली आहे. ही घटना पिंपळे निलख येथे शुक्रवार(दि.4) व रविवार (दि.6) या दोन दिवसांच्या कालावधीत घडली.

याप्रकरणी सारंग रविंद्र घोलप (वय 41 रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Theft In Doctor’s House: नोकरानेच केली डॉक्टरच्या घरात चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असताना आरोपींनी पार्कींगमधल्या सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारून फ्लॅटचा दरवाजा तोडला. यावेळी त्यांनी घरात प्रवेश करत घरातील कपाटातून 15 हजार रुपये रोख व 50 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 65 हजार रुपयांची चोरी केली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.