Wakad : वाकडमध्ये दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण दोन लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना कस्पटेवस्ती, वाकड येथे शुक्रवारी (दि. 28) पहाटे उघडकीस आली.

नीलेश बाबासाहेब आजबे (वय 47, रा. यशवंत कॉलनी, कस्पटेवस्ती, वाकड), यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आजबे हे रिक्षाचालक आहेत. शुक्रवारी मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान आजबे यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून आतील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, साडेचार तोळे चांदीचे दागिने व रोख 60 हजार रुपये असा एकूण दोन लाख 13 हजार 740 रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.