Pune : कोंढव्यामध्ये घरफोडी करुन साडेतीन लाखांचा ऐवज लुटला

एमपीसी न्युज – कोंढवा-बुद्रुक पुणे येथील खडीमशीन चौकातील शांती हाईट्स येथील एका कुलुपबंद फ्लॅटचे कुलुप तोडुन अज्ञात इसमाने रोख 50,000 रुपये व सोन्याचे दागिने असा एकुण 3,50,000 रुपयांचा ऐवज लुटला आहे. ही घटना (दि19) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली

विकास बघे,( वय 29, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी या विषयी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली आहे. फ्लॅटला कुलूप असताना अज्ञात इसमाने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून काढले. फिर्यादी यांच्या कपाटातील 50,000 रुपये रोख व तीन लाखाचे सोन्याचे दागिने असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज चोराने लंपास केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.