Hinjawadi Crime News : पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – घराबाहेर मोठमोठ्याने हॉर्न वाजवून पिस्तुलाचा धाक दाखवून दोघांनी मिळून एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 7) रात्री अकरा वाजता महाळुंगे येथे घडली.

सिद्धेश बाळू हागवणे (वय 30, रा. महाळुंगे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल शेलार (रा. बोतरवाडी, ता. मुळशी) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहेत. शुक्रवारी रात्री ते त्यांच्या घरी झोपले असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या बेडरूमच्या खिडकीसमोर रस्त्यावर आले. आरोपींनी आणलेल्या फॉर्च्युनर गाडीचा हॉर्न त्यांनी जोरजोरात वाजवला. त्यामुळे फिर्यादी यांनी उठून पाहिले असता आरोपी विठ्ठल याने फिर्यादी यांना बाहेर ये, असे म्हणून रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.