Chinchwad Crime News : शहर परिसरातून पाच दुचाकी, एक रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या हद्दीतून एक रिक्षा आणि पाच दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 8) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक रिक्षा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रदीप बाबापु डोलारे (वय 29, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रिक्षा चोरणारा आरोपी रोशन प्रकाश नरवडे (रा. नाणेकरवाडी, चाकण) याला अटक केली आहे. फिर्यादी यांची दीड लाख रुपये किमतीची रिक्षा आरोपीने 6 जानेवारी रोजी मध्यरात्री चोरून नेली होती.

विपुल सतीश बनसोडे (वय 29, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरापासून चोरून नेली. ही घटना 24 डिसेंबर रोजी उघडकीस आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

तुषार सुभाष खताळ (वय 24, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी वेदांत संकुल, मुटकेवाडी चाकण येथून चोरून नेली. ही घटना 7 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

नितीन बापूराव शिंदे (वय 36, रा. मांजरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी नाणेकरवाडी येथील यशोदीप कॉम्प्लेक्स येथून चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी उघडकीस आली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

आनंद श्रीपती भोसले (वय 45, रा. बोपोडी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी ओम चेंबर्स टी ब्लॉक, बालाजीनगर येथील कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली. ही घटना 21 डिसेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत घडली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

शिवहरी गुरुनाथ राऊत (वय 32, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी अंकुश चौक, ओटास्कीम येथील भाजी मंडई मधून चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी पाच वाजता घडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.