India China Border : घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना घेतलं ताब्यात

एमपीसी न्यूज : भारत आणि चीन यांच्यात तणाव कायम असतानाच पूर्व लडाखमध्ये चुशूल विभागातील गुरंग खोऱ्याजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून भारतीय हद्दीत आलेल्या चिनी सैनिकाला भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे. दिशा भरकटल्याने आपण भारताच्या हद्दीत आल्याचा दावा या सैनिकाने केला आहे.

सध्या याची चौकशी सुरू असून समाधानकारक माहिती मिळाल्यानंतरच त्याला चिनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, शुक्रवारी सकाळी भारतीय हद्दीत आलेल्या चिनी सैनिकाला पकडण्यात आले आहे.

पूर्व लडाखमध्ये मागच्या वर्षीपासून दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव आहे. दोन्ही देशांचे सैन्य सध्या समोरासमोर उभे आहे. दोन्ही बाजूंनी लढाऊ विमाने तसेच अत्याधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी आणि मुत्सद्दी याच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पडल्या परंतु सीमावादातून कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आक्रमक चीनला भारताने प्रत्येक आघाडीवर तोडीस तोड उत्तर दिले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.