Chinchwad Crime News : दिग्दर्शक महिलेच्या कारची काच फोडून रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – चित्रपट दिग्दर्शक असलेल्या एका महिलेच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधून रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 29) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

रेखा करण कुरील (वय 43, रा. सुस रोड, मुळशी. मूळ रा. टिळक नगर, चेंबूर मुंबई) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शक म्हणून काम करतात. मंगळवारी रात्री फिर्यादी रेखा, त्यांची मुलगी आणि सहकारी अभिनेता असे तिघेजण कारमधून ऐश्वर्या व्हेंचर सोसायटी, आकुर्डी येथे मानलेल्या भावाच्या घरी जेवणासाठी आल्या होत्या.

जेवण केल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या असता त्यांच्या कारच्या मागील बाजूची दरवाजाची काच फुटलेली दिसली. कारमधील पर्स अस्ताव्यस्त पडलेली होती. रेखा यांनी पर्स उघडून पाहिले असता पर्समध्ये असलेले 4 हजार 500 रुपये नव्हते. याबाबत त्यांनी बुधवारी फिर्याद दिली असून याप्रकरणी पिंपरी पोलीस आणखी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.