Aurangabad News : चक्क अळूला आलं फुल! निसर्गाच्या किमयेची राज्यभर चर्चा

एमपीसी न्यूज – निसर्गात नेहमीच काहीतरी वेगवेगळे चमत्कार घडत असतात. कधीकधी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट जेव्हा अगदी सहजतेने घडते तेव्हा मात्र आश्चर्याने आ वासून पाहावे लागते, असेच काहीसे औरंगाबाद शहरातील वाळूज येथे घडले. तुम्ही कधी अळूला फुलं आल्याचे पाहिले किंवा ऐकले का हो? वाळूज येथे अळूच्या पानाला फुल आल्याने ते पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी होत असून सगळ्यांमध्ये हा कुतुहलाचा विषय बनला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाळूजच्या गणेश वसाहतमध्ये राहणारे राजू शिवलाल ( मूळ रा. सटाणा, वैजापूर ) यांना झाडांच्या संगोपनाची आवड असल्याने त्यांनी विविध झाडांची रोपटे आणली होती, त्यामध्ये अळूच्या पानांची चार – पाच रोपटी चारच महिन्यांपूर्वी आणून त्यांनी लावली होते. दरम्यान, नित्यनेमाने रोपट्यांची काळजी घेत असताना सोमवारी शिवलाल यांच्या पत्नी तुळसाबाई यांना अळूच्या रोपट्याला फुल व कळी आल्याचे दिसले.

याबाबत वसाहतीत कळले असता ते फुल पाहण्यासाठी लोकांनी मात्र एकच गर्दी केली. निसर्गाच्या या किमयेविषयी केवळ परिसरातच नव्हे तर अगदी राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे . दरम्यान, असे अळूच्या पानांना फुल पहिल्यांदाच पाहिल्याचं परिसरातील वयोवृद्धांकडून प्रतिक्रिया मिळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.