Pimpri News : कै. नारायणराव चोंधे शिक्षण संकुलात जागतिक दिव्यांग दिन साजरा

एमपीसी न्यूज – कै. नारायणराव चोंधे शिक्षण संकुलात पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका आरती चोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भवानी पेठ पुणे तसेच पिंपरी चिंचवड मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 9 डिसेंबर या कालावधीत ‘ जागतिक दिव्यांग दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. 6 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन सप्ताह व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका आरती चोंधे, विशेष मार्गदर्शक विषयतज्ञ शुभांगी साकोरे, विशेष शिक्षक मंगल गायकवाड, दत्तात्रय गवळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमच्या सुरवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन भांबुरे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना नगरसेविका आरती चोंधे, मंगल गायकवाड, दत्तात्रय गवळी, शुभांगी साकोरे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात नृत्य, गायन, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, बादलीत बॉल टाकणे आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये डान्स स्पर्धेत निशिगंधा गोवर्धन, गायन स्पर्धेत संजीवनी रत्ने, फॅन्सी ड्रेसमध्ये निखिल म्हेत्रे, बादलीत बोल टाकणे या स्पर्धेत ज्योती धस व निबंध चित्रकला स्पर्धेत पायल दळवी या दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समारोप सोनाली सोनकांबळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.