Pimpri News : माजी नगरसेवक दिगंबरशेठ काळभोर यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक दिगंबरशेठ शंकर काळभोर (वय 86) यांचे रविवारी (दि. 5) सकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

दिगंबरशेठ काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून सन 2002 मध्ये काम पाहिले. त्यांनी पवना सहकारी बँकेचे संचालक म्हणून सुद्धा काम केले.

शहरातील व राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. स्पष्ट व निर्भीड स्वभाव ही त्यांची ओळख होती. पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ते प्रभावी, आदरणीय नेते होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.