Maval : शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित ; बारणे यांना पावणेदोन लाखांचे मताधिक्य

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का बसल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे 1,70,292 मतांची निर्णयाक आघाडी घेतली आहे.

आतापर्यंत श्रीरंग बारणे यांना 5,54,259 मते तर पार्थ पवार यांना 3,83,967 मते मिळाली आहेत. 2014 च्या निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे यांनी लक्ष्मण जगताप यांचा पराभव करताना 1,57,377 मतांची आघाडी मिळवली होती. पार्थ पवार यांच्या विरोधात त्यांनी 1 लाख 70 हजारांची आघाडी मिळवत मागील रेकॉर्ड तोडले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.