Chakan Accident : कंटेनर रिव्हर्स घेत असताना धडक लागून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चाकण येथे कंटनेर (Chakan Accident) चालकाने पाठीमागे न पाहताच कंटेनर रिव्हर्स घेत असताना एका 50 वर्षीय व्यक्तीला धडक बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.18) कुरळी येथील बरक्यू लॉजिस्टीक कंटेनर पार्किंग येथे सायंकाळी घडली आहे.

गणपत नारायण काळे (वय 50, रा.कुरुळी) यांचे या अपघातात निधन झाले असून त्यांचे जावई दत्तात्रय उत्तम ढोपे (वय 30, रा. कुरुळी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून एच.आर.38 झेड 6106 या कंटेनरच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

PCMC : उप अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे बरक्यू लॉजिस्टीक कंटेनर पार्किंग (Chakan Accident) येथे उभारले होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील कंटेनर हयगयीने चालवतच रिव्हर्स घेण्यास सुरुवात केली. यावेळी मागे उभे असलेले काळे यांना कंटेनरची जोरात धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी केंटेनर चालकाने काळे यांना मदत न करता ते तिथून पळून गेला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.