PCMC : उप अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) कनिष्ठ अभियंतापदावरुन उपअभियंतापदी बढत्या मिळालेल्या 17 आणि 40 कनिष्ठ अभियंता अशा 57 अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे एकाच वेळी बदल्या करण्यात आल्या आहेत.

महापालिकेतील अभियंत्यांचा बांधकाम परवानगी, स्थापत्य विभाग मिळावा यासाठी प्रयत्न असतो. हे दोन्ही विभाग मलईदार मानले जातात. त्यामुळे या दोन्ही पैकी एका विभागात बदली होण्यासाठी अभियंते प्रयत्नशील होते. काही अभियंते अनेक वर्षांपासून याच विभागात कार्यरत आहेत.

Nigadi Fraud : फायनान्स कंपनीची सुमारे 22 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक

महापालिका प्रशासनाने 17 कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता (स्थापत्य) पदी तीन (PCMC) महिन्यांपूर्वी बढती दिली आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी उपअभियंत्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बढती दिलेल्या या 17 अभियंत्यांना पदस्थापना विविध विभागात पदस्थापना दिली आहे. दरम्यान, स्थापत्य विभागातील 40 कनिष्ठ अभियंत्यांच्या समुपदेशनाव्दारे बदल्या करण्यात आल्या आहे. या अभियंत्यांना महापालिकेसह, क्षेत्रीय कार्यालयात पदस्थापना देण्यात आली आहे. या बदल्यांबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आदेश जारी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.