Chakan : चाकण येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक ( Chakan) दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री पावणे आठ वाजता खेड तालुक्यातील चाकण येथे घडली.
मनमोहन किशोर गायकर (वय 29) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी रुग्णवाहिका चालक ओमकार बाजीराव कुलाळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात कंटेनर चालकाने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव चालवून मनमोहन चालवत असलेल्या दुचाकीला (एमएच 14/ईके 8250) पाठीमागून जोरात धडक दिली. ही घटना चाकणमधील आयफेल सिटी समोर घडली.
या अपघातात मनमोहन रस्त्यावर पडले. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत ( Chakan)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.