Chakan : अल्पवयीन भाचीचा विनयभंग करणा-या मामावर गुन्हा दाखल

Case filed against uncle for molesting minor niece : हा प्रकार 20 जून ते 26 जुलै या कालावधीत चाकण येथे घडला.

एमपीसीन्यूज – अल्पवयीन भाचीचा विनयभंग केल्याप्रकरणी मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 जून ते 26 जुलै या कालावधीत चाकण येथे घडला.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन भाचीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 37 वर्षीय मामावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी मामाच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपी मामाने घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन तिच्याशी येता-जाता गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

हा प्रकार 20 जून रोजी रात्री सात वाजल्यापासून 26 जुलै दुपारी दोन वाजेपर्यंतच्या कालावधीत घडला. पिडीत मुलीने त्यानंतर तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी मामाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, पोक्सो कायदा कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.