Pimpri: पालिकेची कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमणुकीची निविदा ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून; आमदार जगताप यांचा आरोप

विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर काढल्याचे दिसून येते. अनुभवाची अट व शासकीय, निमशासकीय यंत्रणेत केलेल्या कामाचे अनुभवाच्या अटींची आणि आर्थिक उलाढालीबाबत अटी-शर्तींची योग्य तपासणी करण्यात यावी.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने कंत्राटी सुरक्षा रक्षक, वार्डन नियुक्तीसाठी प्रसिद्ध केलेलीली निविदा विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून काढल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत अटी-शर्तीत बदल करण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.

महापालिकेच्या शहरात विविध मिळकती आहेत. त्यासाठी कंत्राटी तत्त्वावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाते. तसेच शहरातील वाहतूक सुरक्षेसाठी वार्डनची नेमणूक केली जाते.

पालिकेच्या सुरक्षा विभागाने पालिकेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळासाठी रखवालदारांच्या मदतीकरिता मदतनीस आणि वर्दळीच्या चौकात वाहतूक सुरळीत करण्याकरिता ठेकेदारी पद्धतीने वार्डन नेण्यासाठी निविदा काढली आहे.

विशिष्ट ठेकेदाराला डोळ्यासमोर काढल्याचे दिसून येते. अनुभवाची अट व शासकीय, निमशासकीय यंत्रणेत केलेल्या कामाचे अनुभवाच्या अटींची आणि आर्थिक उलाढालीबाबत अटी-शर्तींची योग्य तपासणी करण्यात यावी. त्यात बदल करावेत. जेणेकरून निविदा भरण्यास स्पर्धा होईल.

या निविदा सुरक्षा विभागामार्फत एकत्रित काढण्यात आल्या आहेत. त्याऐवजी महापालिकेच्या आठ कार्यालयाकरिता स्वतंत्र निविदा काढण्यात यावी. स्पर्धात्मक निविदा भरल्याने पालिकेचे आर्थिक हित साधले जाईल, असे आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.