Chakan : चाकण हे भविष्यातील एक बकाल शहर ठरेल – राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज – मागील 10 ते 15 वर्षांपासून पुण्यातील चाकण – खेड भागात मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत आहेत. चाकण – खेड भागातील पी एम आर डी ए च्या सर्व नियोजित रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे भविष्यात हे चाकण शहर नियोजित नाही तर बकाल शहर ठरणार आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले.

याविषयी अग्रवाल पुढे म्हणाले की, भविष्यात इथे कोणता ही डी पी रोड विकसित करणे शक्य नाही. पीएमआरडीएने या भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

अरुंद तळेगाव – चाकण – शिक्रापूर रस्त्यावर प्रत्येक शंभर मीटर वर खड्डे पडलेले आहे. नाशिक फाटा ते राजगुरू नगर रस्त्यांवर तासन् तास वाहतूक कोंडी होते.

पाणी, गटार, साफ सफाई अशी कोणतीही आवश्यक नागरी सोयी सुविधा हया भागात धड नाही. चाकण खेड भागात एम आय डी सी मुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली.

Nigdi : बंदला नागरिकांचा प्रतिसाद सुरू; निगडी येथील साईनाथ नगर पूर्णपणे बंद

आज नाही तरी दहा वर्षांनी हया भागात महानगरपालिका आणाविच लागणार. पण जेवढा उशीरा महानगरपालिका येणार तेवढेच जास्त शहराचे बकालीकरण होणार आहे.

या भागात वाढणारी एम आय डी सी व जन्संख्येचा विचार करुन तातडीने महानगरपालिका आणण्याची गरज आहे.अन्यथा चाकण चे डोळ्यासमोर बकालीकरण असेच सुरु राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.