Chakan Crime News : चालकाने परस्पर विकले 52 हजार लिटर डिझेल ; दोघांवर गुन्हा

0

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपावर विक्रीसाठी खरेदी केलेले डिझेल गाडी चालकाने मालकाच्या परस्पर विकले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 ते 11 एप्रिल दरम्यान भोसे ( ता. खेड) येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप याठिकाणी हा प्रकार घडला.

या प्रकरणी संभाजी कडू सपकाळे (रा. काळेवाडी, वाकड, मुळगाव – जळगाव) व ज्ञानेश्वर कौतिक सपकाळे (रा. रहाटणी, मुळगाव – जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सिद्धार्थ भागुजी लगड (वय 42, रा. दोंदे, ता. खेड) यांनी शुक्रवारी (दि.23) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लोणी काळभोर येथील डिझेल टर्मिनलमधून खरेदी केलेल्या 89 लाख 35 हजार 500 लिटर डिझेलपैकी 52 हजार 587 लिटर डिझेल परस्पर विकले. विक्री केलेल्या डिझेलची किंमत 38 लाख 77 हजार 699 एवढीअसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चिटपल्ले करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment