Chakan Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – कंपनीतून सुटल्यानंतर पायी घरी निघालेल्या कामगाराच्या हातातील मोबाईल दुचाकीवर आलेल्या तीन जणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हिसकावून नेला. ही घटना 27 सप्टेंबप रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास शिवतेज हॉटेलजवळ डोंगरवस्ती निघोडे येथे घडली.

दीपक रामफल दास (वय 29. रा. डोंगरवस्ती, निघोजे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवर आलोल्या तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दास हे बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनी निघोजे येथे कामास आहेत. 27 सप्टेंबर रोजी कंपनीतून सुटल्यावर घरी पायी चालत जात असताना रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्या मागून एक दुचाकी आली. दुचाकीवरील तीन जणांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्यांच्या हातातील 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.