रविवार, जानेवारी 29, 2023

Chakan Fire News : रासे येथील फर्निचरच्या दोन गोदामांना भीषण आग

एमपीसी न्यूज : चाकण शिक्रापूर (Chakan Fire News) रस्त्यावर रासे (ता. खेड) हद्दीतील दोन फर्निचरच्या गोदामांना बुधवारी (दि.21) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत फ़र्निचर, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून सुमारे 25 लाखाहून अधिक मोठी वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप निष्पन्न झाले नाही.

रासे फाटा येथे रस्त्यावरच फर्निचरची शेजारी – शेजारी काही गोदामे आहेत. बुधवारी मध्यरात्री अचानक यातील एका गोदामाला भीषण आग लागली. आगीचे तांडव भयानक असल्याने अपरात्री आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य नव्हते. याबाबतची माहिती पोलिसांना कळविताच चाकण पोलीस व चाकण अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत या भीषण लगतच्या आणखी एका गोदामात आगीचा तांडव सुरु झाला. दोन्ही गोदामातील संपूर्ण फर्निचर, यासाठीचा कच्चा माल, तयार माल व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.

Shambhuraj Desai : …त्या काळात मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नव्हती…शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा प्रचंड (Chakan Fire News) मारा करून आग विझविली. गुरुवारी (दि.22) सकाळी नऊच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या आगीत जीवितहानी टळली आहे. लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आगीत दोन्ही गोदामांचे आणि एका दुचाकी वाहनाचे देखील जळून नुकसान झाले आहे.

Latest news
Related news