Chakan : कांदा,बटाट्याची आवक वाढली

पालेभाज्यांचे भाव तेजीत  

एमपीसी न्यूज :  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, कलिंगड व टोमॅटोची मोठी आवक झाली. लसणाची आवक दुपटीने घटूनही भाव स्थिर राहिले. मुरबाडच्या भेंडीसह गुजरातची हिरवी मिरची, तोतापुरी कैऱ्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. अवकाळी पावसाच्या तडाख्याने आवक घटल्याने पालेभाज्यांचे भाव या आठवड्यात तेजीत राहिले आहेत.(Chakan) फळभाज्यांच्या व पालेभाज्यांच्या बाजारात तरकारी मालाची प्रचंड आवक झाली आहे. जळगाव भुईमुग शेंगा व बंदुक भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई व शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल 4 कोटी, 10 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 11,000 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 हजार क्विंटलने वाढली व  कमाल भाव 1,000 रुपयांवर स्थिरावले. बटाट्याची एकूण आवक 1,250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने वाढूनही भावात 100 रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव 1,500 रुपयांवरून 1,600 रुपयांवर पोहोचला.

Pune : फिटजी क्युरेट शिष्यवृत्ती चाचणी 30 एप्रिल रोजी

जळगाव भुईमुग शेंगां व बंदूक भुईमुग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 30 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक दुपटीने घटली व कमाल भाव 7 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 355 क्विंटल झाली. (Chakan) गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 40 क्विंटलने  घटली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 11,000 क्विंटल. भाव क्रमांक 1.1,000 रुपये, भाव क्रमांक 2.850 रुपये, भाव क्रमांक 3.700 रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1,250 क्विंटल. भाव क्रमांक 1.1,600 रुपये, भाव क्रमांक 2.1,300 रुपये, भाव क्रमांक 3.1,000 रुपये.

 फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 350 क्विंटल ( 500 ते 1,000 रू. ), कोबी – 200 क्विंटल ( 300 ते 600 रू.), फ्लॉवर – 270 क्विंटल ( 500 ते 1,200 रु.), वांगी – 158 क्विंटल ( 1,000 ते 2,000 रु.), भेंडी – 135 क्विंटल ( 2,000 ते 4,000 रु.), दोडका – 63 क्विंटल (3,000 ते 4,000 रु.), कारली – 69 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), दुधीभोपळा – 62 क्विंटल ( 1,000 ते 2,000 रु.), काकडी – 74 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), फरशी – 69 क्विंटल ( 2,000 ते 3, 000 रु.), वालवड – 63  क्विंटल ( 1,500 ते 2,500 रुपये), गवार – 14 क्विंटल ( 7,000 ते 9,000 रू.), ढोबळी मिरची – 136 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रु.), चवळी – 24 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रुपये.), वाटाणा – 50 क्विंटल ( 6,000 ते 8,000 रु.), शेवगा – 55 क्विंटल ( 2,000 ते 3,000 रुपये ), गाजर – 78 क्विंटल ( 1,000 ते 1,600 रु.).

 पालेभाज्या –  
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 34 हजार 950 जुड्या ( 1,000 ते 2,000 रुपये,), कोथिंबीर – एकूण 19 हजार 400 जुड्या ( 500 ते 1,400 रुपये,), शेपू – एकूण 500  जुड्या ( 500 ते 1,000 रुपये ), पालक – एकूण 2 हजार 100 जुड्या ( 400 ते 600 रुपये),.

 जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 48 जर्शी गाईपैकी 27 गाईची विक्री झाली.( 15,000 ते 60,000 रुपये,), 150 बैलांपैकी 124 बैलांची विक्री झाली ( 10,000 ते 40,000 रुपये ), चाकणला विकीसाठी आलेल्या 170 म्हैशीपैकी 145 म्हशींची विक्री झाली. म्हशीला 30 हजार ते 80 हजार रुपये भाव मिळाला. शेळ्या – मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, विक्रीसाठी आलेल्या 8,950 शेळ्यापैकी 8,450 शेळ्यांची विक्री झाली. शेळ्यांना 2 हजार रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.