Chakan News : खेडमध्ये 36 नवे कोरोना रुग्ण; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात सोमवारी (9 ऑगस्ट) 18 गावे आणि 3 पालिकांमध्ये 36 रुग्ण मिळून आले आहेत. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 कुरुळी येथील 90 वर्षीय पुरुषाचा आणि चाकण येथील 26 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.  सदरचे मृत्यू मागील काही दिवसातील असून आजच्या दैनंदिन अहवालात ते नमूद करण्यात आले आहेत.  

सोमवारी खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 33 हजार 720 झाला आहे. यापैकी 32 हजार 3 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. सोमवारी दिवसभरात 7 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 234 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आणखी 2 मृत्यूने 483 एवढा झाला आहे.

9 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 24 रुग्ण, चाकण 1, आळंदी 2, राजगुरुनगर 9 असे एकुण 36 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

 खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे –
भोसे 1, चऱ्होली खु. 1, दावडी 1, गोसासी 1, गुळाणी 1, कडूस 1, करंजविहीरे 1, कोयाळी 1, मरकळ 2, नाणेकरवाडी 1, रेटवडी 3, सांडभोरवाडी 1, शिंदे 4, टाकळकरवाडी 1, वडगाव घेनंद 1, वडगाव पाटोळे 1, वाफगाव 1, येलवाडी 1 असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

झिकाबाबत अतिसंवेदनशील गावे जाहीर

खेड तालुक्यातील काही गावे झिका व्हायरस संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये राजगुरुनगर शहर परिसरातील पांडुरंग नगर, शिरोली, आळंदी, मरकळ, भोसे, निघोजे, मोई, मेदनकरवाडी, गोसासी ही खेड तालुक्यातील गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.