Chakan News : लग्नासाठी दहा तोळे सोने आणि इनोव्हा गाडीची मागणी

तरुणा विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – साखरपुडा झाला असताना दहा तोळे सोने आणि इनोव्हा गाडी दिल्याशिवाय लग्नास नकार देणाऱ्या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 5 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबर दरम्यान खेड तालुक्यातील येलवाडी गावात घडली. 

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी चाकण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवरदेव ओमकार तानाजी टेमगिरे (वय 22, रा. चिंचवड) व गणेश ज्ञानोबा पारखी (वय 35, रा. माण, हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी व आरोपी ओंकार टेमगिरे यांचा साखरपुडा झाला आहे. साखरपुड्यात एक तोळा सोन्याची अंगठी देऊन लग्न करण्याचं ठरलं होतं. मात्र, नवरदेवाने दहा तोळे सोने आणि इनोव्हा गाडी दिल्याशिवाय लग्न करण्यास नकार दिला. तसेच मुलीला तुझे लग्न कसं होतं तेच बघतो तुला ठार मारतो अशी धमकी दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.