Chakan : घरातील सर्दीचे औषध पाजल्याने दीड वर्षांच्या बालकाचा मृत्यू; खराबवाडीतील घटना

एमपीसी न्यूज – सर्दी झाल्याने पालकांनी घरातील सर्दीचे औषध पाजल्यानंतर अचानक उलटी होऊन दीड वर्षांच्या बालकाचा रुग्णालयात नेऊन पुढील उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना खराबवाडी (ता. खेड) येथे शनिवारी (दि.२५) घडली आहे.

स्वयंभू जगदीश सुखापुरे (वय दिड वर्ष , रा. स्पाईन सिटी, खराबवाडी, ता. खेड, जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. जगदीश दिलीप सुखापुरे ( वय २५ वर्षे, रा. खराबवाडी) यांनी या बाबत चाकण पोलिसांत माहिती दिली आहे.

  • याबाबत मिळालेली माहिती अशी, बालक स्वयंभू यास शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सर्दीचा त्रास झालेने त्यास पालकांनी घरातील जुने सर्दीचे औषध दिल्याने त्यास उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर लगेचच त्याला दुपारी दीडचे सुमारास चाकण ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी मयत घोषीत केले. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.