Chakan : सहा वर्षीय चिमुकलीवर अज्ञाताकडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – सहा वर्षीय चिमुकलीवर अज्ञात व्यक्‍तीने लैंगिक अत्याचार केले. पीडितेला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 20 ते 26 मार्च दरम्यान घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 31) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 26 मार्च 2020 या कालावधीत अज्ञात व्यक्‍तीने फिर्यादी यांच्या सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. यानंतर महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.