Pimpri : ‘कोरोना’पासून या ‘पंचसूत्री’चे पालन करा : प्रशासनाचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोना हळूहळू पाय पसरू लागला आणि दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्यासुद्धा वाढायला लागली आहे. संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या वेगवेगळ्या लोकांना समाजसेवी संस्थांची मदत पोहोचू लागली. या निमित्ताने होणारी गर्दी, चर्चा, पत्रकार परिषद, सरकारी कार्यालयातील सभा या ठिकाणी ‘सोशल डिस्टनसिं’च्या नियमांना धाब्यावर बसवल्याचे पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अगदी शेजारी बसले होते. यावर उपाय म्हणून सरकारने समुदायाच्या भेटी दरम्यान अवलंब करण्यासाठी पंचसूत्री सांगितली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. संचार बंदीच्या नियमांचे पालन जर नागरिकांनी केले नाही तर यापुढे कठोर पावले उचलली जातील, असा त्यांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’पासून बचावासाठी आपण योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

सरकारने सांगितलेली पंचसूत्री पुढील प्रमाणे

1) स्वतः व इतरांमध्ये 1 मीटर पेक्षा अधिक अंतर ठेवा आणि संवाद साधताना निकटचा संपर्क टाळा.
2) आपले तोंड व नाक झाकण्यासाठी तीन स्तरीय मास्क वापरा. चेहऱ्यावर ते योग्यरित्या चढवले गेले आहे याची खात्री करा.

3) सतत आपल्या चेहऱ्याला (डोळे, नाक, तोंड) स्पर्श करणे टाळा. वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून किंवा 70% अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने स्वच्छ धुवा.

4) वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून किंवा 70% अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने स्वच्छ धुवा.

5) दरवाजाची घंटी, डोअर नॉब, सपोर्ट रेल, हँडल्स व हँड रेल इत्यादी सतत स्पर्श करण्यासारख्या गोष्टींना स्पर्श करणे टाळा.

6) समुदायाच्या भेटीदरम्यान या गोष्टीं लक्षात ठेवून आपण यासवयींचा अवलंब करून कोरोना पासून आपला बचाव केला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.