Chakan: सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

आरोपी पती आणि सासू यांनी विवाहितेकडे जागा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच या कारणावरून विवाहितेला दमदाटी व मारहाण देखील केली.

एमपीसी न्यूज – जागा घेण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 31 जुलै रोजी चाकण येथे घडली. याबाबत पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती योगेश पांडुरंग शिंगोटे (वय 33, रा. चाकण), सासू दुर्गाबाई पांडुरंग शिंगोटे (रा. जवळाबाजार, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मृत विवाहितेच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश आणि फिर्यादी यांची मुलगी यांचा 11 मे 2015 रोजी विवाह झाला. विवाहानंतर सुमारे दीड वर्ष सासरच्या मंडळींनी विवाहितेला चांगले वागवले.

त्यानंतर आरोपी पती आणि सासू यांनी विवाहितेकडे जागा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच या कारणावरून विवाहितेला दमदाटी व मारहाण देखील केली.

सासरच्या या त्रासाला कंटाळून विवाहितेने 31 जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती आणि सासू यांनी विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.