Chakan accident : टेम्पो व मोटरसायकलच्या धडकेत मोटरसायकलस्वार पती-पत्नी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : टेम्पो ने मोटरसायकलला समोरून धडकल्याने मोटरसायकल वरील पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. (Chakan accident) हा अपघात येलवाडी फाटा ते देहूगावाकडे जाणाऱ्या रोडवर एच पी पेट्रोल पंपासमोर येलवाडी, तालूका खेड, जिल्हा पुणे येथे घडला.

याबाबत निलेश शेवकर, वय 33 वर्षे, रा. इंदोरी, तालुका मावळ, जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे. टाटा कपंनीचा छोटा हत्ती गाडी नंबर एम एच 14 टी सी एल 608 वरील चालक नाव पत्ता माहिती नाही या आरोपी विरोधात चाकण (महाळुंगे) पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 279, 337, 338, मोटर वेहिकल कायदा कलम 184, 134(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल आहे.

Diwali Pahat : शास्त्रीय व भक्तीगीत गायनाने रंगली दिवाळी पहाट

हा अपघात 20 ऑक्टोबर ला दुपारी 3.15 वा चे सुमारास येलवाडी फाटा ते देहूगावाकडे जाणाऱ्या रोडवर एच पी पेट्रोल पंपासमोर येलवाडी, तालूका खेड, जिल्हा पुणे येथे घडला होता. फिर्यादी त्यांच्या मोटरसायकल वरून येलवाडी फाटा ते देऊळगाव कडे जाणाऱ्या रोडवरून जात असताना एचपी पेट्रोल पंपा समोर येणाऱ्या टाटा कंपनीच्या छोटा हत्ती टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव  वेगाने अविचाराने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून फिर्यादीच्या मोटरसायकलला समोरून उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. त्यामुळे फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नी गंभीर जखमी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.